नवी दिल्ली : भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला असून त्यांच्यावरील कारवाईसाठी अनेक कुस्तीपटू दिल्लीत धरणे धरून बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी- वढेरा यांनी समर्थन दिले असून सरकार दोषी व्यक्तींना का वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
प्रियकां गांधी यांनी म्हटले आहे की, देशाचा सन्मान वाढवणाऱ्या खेळाडूंच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि जेव्हा पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचा अहंकार गगनाला भिडतो तेव्हा असाच आवाज चिरडण्याचा प्रयत्न केला जातो. ब्रिजभूषण यांना अटक होईपर्यंत आम्ही धरणे मागे घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे




