राज ठाकरे यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची स्वयंभू नेते म्हणून जी हेटाळणी केली त्याविषयी संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. ‘हो आम्ही स्वयंभूच आहोत ना. जी स्वयंभू दैवतं असतात त्यांच्या मागेच जनता जाते. इतर कोणी जे काही दगडांना शेंदूर फासतात आणि आता या दगडांना देव म्हणा सांगतात, त्यांचं लोक ऐकत नाहीत. या शेंदूर फासलेल्या दगडांना लोक वाकून नमस्कार करत नाहीत. स्वयंभू देवता आणि नेत्यांनाच तो श्रद्धेचा मान मिळतो. तो मान ठाकरे कुटुंबीयांना दिला जातो. याच्यामुळे कोणाची पोटदुखी असेल तर त्यांनी सांगावं, आमच्याकडे त्यावर उपचार आहे, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.



