आपण लवकरच सत्तेत असू आणि आपली कामं आता ५० टक्के नाही तर १०० टक्के पूर्ण होतील असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कामगार मेळावा आज मुंबईत पार पडला. त्यावेळी बोलत असताना अमित ठाकरेंनी हा विश्वास व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी आपल्या भाषणात हे मळभ लवकरच दूर होईल आणि आपण सत्तेत असू असं म्हटलं होतं. त्यानंतर आता अमित ठाकरेंनीही याच प्रकारचं वक्तव्य केलं आहे जे चांगलंच चर्चेत आहे.



