
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. मोहित कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्य सचिन कांबळे मोहित कंबोज यांच्याबाबत दावा करत आहेत. “लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे देवेंद्र फडणवीस यांचे खास मोहित कंबोज मुलींना घेऊन नाचत आहेत, धिंगाणा घालत आहेत”, असा दावा त्यांनी केला आहे.
रात्री साडेतीन वाजता त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. “येथे कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?” असा प्रश्नही त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. “बेधुंद अवस्थेत, नशा करून ते मुलींसोबत नाचत आहेत”, असंही ते म्हणाले. “आमच्या सभा साडेदहा वाजताच बंद करता आणि मग यांना साडेतीन वाजेपर्यंत मुलीसोबत कसे नाचू शकतात”, असा सवालही कांबळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.



