मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केला आहे. शरद पवार यांनी निर्णय घोषित केल्यानंतर निर्णय मागे घ्या, अशी घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांनी केली. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल असं अजित पवार म्हणाले.
त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती देखील केली. एवढंच नाही तर, शरद पवार यांनी घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावुक झाले. तर थोड्याच वेळात शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत शरद पवार काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘तुमच्या भावना साहेबांना कळाल्या आहेत. समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल. कमिटी म्हणजे मोठी लोकं नाहीत. परिवारातील सदस्य असतील. मी असेल सुप्रिया सुळे असतील. तुम्ही भावनिक साथ जी साहेबांना घातली, ती आमच्या लक्षात आली आहे. पण तुम्ही काही अडचण लक्षात घ्या. कमिटी तुमच्या मनातील योग्य निर्णय घेईल. एवढीच खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देतो असं अजित पवार म्हणाले.


