
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा शरद पवारांनी मंगळवारी ( २ मे ) केली होती. शरद पवारांच्या या निर्णयामुळे नेते, कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. पण, आज ( ५ मे ) शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी काय म्हटलं?
यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, “मी निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केलं. त्याचबरोबर देशभरातून आणि विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी आणि कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, असा आग्रह धरला.



