भाकरी फिरवावी लागते ती फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. मुंबईत युवक काँग्रेसच्या युवा मंथन कार्यक्रमात ते नेतृत्वाबद्दल बोलले होते. शरद पवार म्हणाले की, ‘आगामी महापालिका निवडणुकांमध्ये नवं नेतृत्व तयार केलं जाईल. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, भाकरी फिरवली नाही तर ती करपते. “मी भाकरी फिरवायला निघालो होतो, पण भाकरी थांबली शरद पवार म्हणाले,
त्यानंतर काहीच दिवसांत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा अनेकांनी पवारांच्या या निर्णयाचा आणि भाकरी फिरवण्याच्या वक्तव्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला. तेव्हा या सर्व मंडळींना समजावताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “पवारसाहेब निर्णय घेत असताना लोकशाही पद्धतीने चर्चा करुन निर्णय घेतात. काही दिवसांपूर्वी साहेब म्हणाले होते, आता भाकरी फिरवायची वेळी आली आहे. तेव्हा कार्यकर्त्यांना वाटलं होतं आता पक्षात काही बदल होतील. परंतु आज त्या वक्तव्याचा अर्थ उलगडला.



