मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात एमआयने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १९९ धावा केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली. प्रत्युत्तरात मुंबईने १६.३ षटकांत ४ गडी गमावून २०० धावा केल्या आणि सामना ६ गडी राखून जिंकला.
मुंबईसाठी चांगली सुरुवात झाली
२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. इशान किशनने येताच मोठे फटके मारण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्या टोकाला रोहित शर्मा शांत राहिला. ५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशान किशन २१ चेंडूत ४२ धावा करून झेलबाद झाला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर वानिंदू हसरंगाने रोहित शर्माला एलबीडब्ल्यू आऊट केले. मुंबईच्या कर्णधाराने ८ चेंडूत ७ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार मारला.
सूर्याची वादळी खेळी –
१६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मुंबईला तिसरा धक्का बसला. वेगवान फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव ३५ चेंडूत ८३ धावांची खेळी करून झेलबाद झाला. या खेळीत स्कायने ७ चौकार आणि ६ शानदार षटकार ठोकले. पुढच्याच चेंडूवर टीम डेव्हिडनेही झेलबाद झाला. त्याचे खातेही उघडले नाही. नेहल वढेराने ३४ चेंडूत ५२ धावा केल्यानंतर नाबाद राहिला आणि कॅमेरून ग्रीनने २ चेंडूत २ धावा केल्या.




