नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या मोठा निर्णय देणार आहे. शिवसेना पक्षातील मतभेदानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील वादाशी संबंधित खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता उद्या निकाल येणार आहे. हा निकाल फक्त शिवसेनेसाठी महत्वाचा नाही तर या निकालाच्या भविष्यातील राजकारणावर देखील प्रभाव पडणार आहे.
भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी समलैंगिक विवाह प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, ते उद्या दोन प्रकरणांमध्ये निकाल देणार आहेत. उध्दव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरण तसेच दुसरे प्रकरण दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील वादाशी संबंधित आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे वादाच्या निकालावर सर्वांते लक्ष लागले आहे.
चंद्रचूड म्हणाले, “उद्या आम्ही घटनापीठाशी संबंधित दोन निकाल देणार आहोत.” यावेळी चंद्रचूड यांनी ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितले की, “समलैंगिक विवाह प्रकरणातील युक्तिवाद उद्या दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरू होऊ शकतो, कारण सकाळची प्रचंड गर्दी असेल.



