मुंबई : सर्वोच्च न्यायालय उद्या (गुरुवारी) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि इतर काही याचिकांवर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायायलाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यामधील काही आमदार विद्यमान सरकारमध्ये मंत्रीपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला एकप्रकारे धक्का बसू शकतो.



