मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता यावर निकाल देतील. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं सरकार बचावलं आहे. राहुल नार्वेकर आता याप्रकरणी काय निकाल देतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राहुल नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रात परतल्यावर याप्रकरणी कार्यवाही करतील. दरम्यान, नार्वेकर यांनी काही माध्यमांशी बातचित केली आणि आमदारांच्या अपात्रतेबद्दल माहिती दिली.
राहुल नार्वेकर म्हणाले, आमदारांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. हे सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा नमूद केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. येत्या काळात यावर सुनावणी घेऊ. आम्ही याप्रकरणी लवकारत लवकर योग्य तो निर्णय घेऊ. परंतु त्याआधी आपल्याला इतर कार्यवाही पूर्ण करावी लागेल.



