प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अलीकडेच बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याशी पंगा घेतला होता. शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर कडू आणि राणा यांच्यातील वाद मिटला आहे. यानंतर आता बच्चू कडू आणि अमरावतीतील भाजपाचे स्थानिक पदाधिकारी गोपाल तिरमारे यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे.
भाजपा पदाधिकारी गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्यावर निवडणूक लढवण्यावर पाच वर्षांची बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी अमरावती येथे पत्रकार परिषद घेत ही मागणी केली. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्यावर विविध आरोपही केले.



