मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने आता दुसऱ्यांना समन्स बजावले आहे. नव्या समन्सनुसार २२ मे रोजी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती जयंत पाटील यांनी ईडीला केली होती. जयंत पाटील यांची विनंती मान्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस जारी केली होती. यानुसार, त्यांना १२ मे रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, चौकशीसाठी हजर राहण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती. यानंतर आता २२ मे रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत



