पहिल्या तीन नंबरसाठी एकूण सात विद्यार्थी
भोसरी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएससी) बोर्डाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये इंद्रायणीनगर भोसरी येथील प्रियदर्शनी स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यामध्ये पहिल्या तीन नंबरसाठी ७ मुलांमध्ये टक्केवारी मिळविण्यात चूरस पहावयास मिळाली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक नरेंद्र सिंग सर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
प्रथम क्रमांक अथर्व भाजीपाले याला 98% गुण मिळाले. दुसऱ्या क्रमांकासाठी तीन मुलांना समान गुण मिळाले आहेत. यामध्ये आयुष वसगडे, कृतिका शिर्के आणि आर्यन पराड या तिघांना 97.20% गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठीही तीन विद्यार्थ्यांनी समान गुण मिळवले आहेत. यामध्ये दिव्या जाधव, रूचा दशनम आणि आदित्य वामन या तिन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 97 टक्के गुण मिळाले आहेत. तसेच शंभर पैकी 100 गुण मिळवणारे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ९ विद्यार्थी, संस्कृतमध्ये ८ विद्यार्थी व गणित मध्ये ३ विद्यार्थी आहेत.
यावर्षी दहावीसाठी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी १२१ विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डात परीक्षा दिली. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 90% पेक्षा अधिक गुण मिळवलेले 29 विद्यार्थी आहेत. डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झालेले 51 विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीमध्ये 30 विद्यार्थी आणि उर्वरित अकरा विद्यार्थी असे एकूण 121 विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.




