मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे निकाल दिला नाही. तर तो विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला. पण आता विधानसभा अध्यक्षांपुढे निर्णय घेताना काय परिस्थिती असेल यावर अनेक मतमतांतर दिसून येत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील तसेच उर्वरित २४ आमदार भाजपत जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जयंत पाटील म्हणाले, “मला वाटतं की १६ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार निश्चितच कोसळेल. तसेच शिंदे गटाचे उरलेले आमदार हे कदाचित पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटात पुन्हा जातील. तसेच संख्येनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल त्यानंतर राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील. त्यानंतर जर त्यांच्याकडं पुरेसा आकडा असेल तर ते सत्ता स्थापन करतील असे म्हटले आहे.


