नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी 2 जून) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
यशवंतपूर-हावडा सुपरफास्टने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या काही डब्यांच्या रुळावरून घसरलेल्या बोगींना धडक दिली आणि ती विरुद्ध रुळावर पडली, असे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर ट्विट करत या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. “मी रेल्वेमंत्र्यांशी बोललो, परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे,” असे त्यांनी ट्विट केले आहे.(




