मुंबई – मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी अर्थात ‘सुलोचना लाटकर’ यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
सुलोचना लाटकर यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी (3 जून) लाटकर यांची तब्येत बिघडली आणि अशा स्थितीत त्यांना काल रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मार्च महिन्यातही सुलोचना यांची तब्येत बिघडली होती.



