घोडेगाव तालुक्यातील घोडेगाव पासून जवळ असलेल्या गावात चार जणांनी मिळून एका महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला आहे. याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला पकडण्यात आले आहे तर तीन जण फरार असून त्यांना शोधण्याचा तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दि. 23 रोजी पीडित महिलेला आकाश चंद्रकांत भालेराव या तिच्या प्रियकराने मोटारसायकलवरून अज्ञात ठिकाणी नेले. येथे दोघे बसले असताना मोटरसायकल वरून संदेश अशोक जाधव, संजय (पूर्ण माहित नाही) व आदेश अशोक जाधव हे तिघे आले व त्यांनी सदर महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच जर कोणाला याबाबत सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
याबाबत सदर महिलेने घरी येऊन सांगितले व त्यानंतर घोडेगाव पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात तक्रार दिली. यातील आकाश चंद्रकांत भालेराव याला पोलिसांनी पकडले आहे व तिघांचा शोध सुरू आहे. सदर गुन्हा पोलीस उपनिरीक्षक महेश पवार यांनी दाखल केला आहे तर पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक करत आहे.




