मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा थेट सवाल विचारत अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
आजपर्यंत लोकांसमोर मला व्हिलन केलं जातं आहे ते कळत नाही. आजही माझे श्रद्धास्थान शरद पवार आहे. शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा पहिले दिला आणि नंतर मागे घेतला तेव्हा सुप्रियाला मी म्हणालो की, पवार साहेबांनी थांबावं तर ती म्हणाली ते हट्टी आहेत, ऐकणार नाही. शरद पवार आजही माझे आदर्श आहेत, मात्र माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो,
मात्र माणसानं कधीतरी थांबावं..तरूणांना संधी कधी देणार..चुकलं तर तुम्ही आम्हाला दुरूस्त करा, कान धरा…मार्गदर्शन करा आता नवीन पिढी समोर येतेय. चुकलं तर अजित तुझं चुकलं असं सांगा, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढं जाऊ. पण कोणासाठी चाललंय हे? असं चित्र का निर्माण केलं जात आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.



