नव्या अवकाश भरारीसाठी सज्ज झालं आहे. आज श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 प्रक्षेपित केलं जाणार आहे. इस्रोच्या बाहुबली रॉकेट द्वारे चांद्रयान-3 लाँच करण्यात येणार आहे. लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-3) म्हणजेच ‘बाहुबली रॉकेट’ मिशन चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. एलव्हीएम-3 रॉकेटचं हे सातवं उड्डाण असेल. LVM-3 रॉकेटच्या यशस्वी उड्डाणाचा दर 100 टक्के आहे. LVM-3 भारतातील सर्वात वजनदार रॉकेट आहे, यामुळेच याला बाहुबली रॉकेट असंही म्हटलं जातं. LVM-3 रॉकेटने यापूर्वीच्या सहा मोहिमा यशस्वीरित्या राबवल्या आहेत.
बाहुबली रॉकेट’ द्वारे चांद्रयान-3 चं प्रक्षेपण
आज भारताच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पान लिहिलं जाणार आहे. अवकाशाच्या जगात आणखी एक पाऊल टाकणार आहे. चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यात चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज दुपारी 2.35 वाजता चांद्रयान 3 प्रक्षेपित केलं जाईल. मिशन चांद्रयान-3 चं काऊंटडाऊन सुरु झालं आहे.
यामुळे चांद्रयान-3 सोबतच इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ची चर्चा आहे इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 प्रक्षेपित केलं जाईल. बाहुबली रॉकेटची उंची 43.5 मीटर आणि वजन 6.4 लाख किलो आहे. LVM-3 रॉकेटने सहा अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत.




