नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुभाजन झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यातील गदायुद्धाने आणखी एक उंची गाठली आहे. शरद पवार यांनी नेमलेल्या दहा राज्यांतील प्रदेशाध्यक्षांना अजित पवार यांनी पदावरून हटविले आहे.
अजित पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राकाँच्या दहा राज्यांतील प्रदेशाध्यक्षांची पदावरून पायउतार केले आहे.
सुरुवातीला शरद पवार आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा केला होता. आधी शरद पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेणारे नऊ मंत्र्यांना निलंबित केले. आता अजित पवार यांनी दहा प्रदेशाध्यक्षांची उचलबांगडी केली आहे. अजित पवार यांच्या गटाने निष्क्रियता आणि संघटनेचे काम योग्य पद्धतीने न केल्याच्या आरोपावरून त्यांना तातडीने उचलबांगडी करण्यात आली आहे.



