रायगड – जिल्ह्यातील खालापूर तहसील क्षेत्रातील इर्शलवाडी गावात भूस्खलन झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफची दोन पथके मदतकार्यासाठी रवाना झाली आहेत. गावातील या भूस्खलन झाले आहे. यामध्ये अनेकजण जमिनीच्या मलब्याखाली आल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आत्तापर्यंत २२ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
“एनडीआरएफ, पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास १०० जणांची टीम घटनास्थळी दाखल असून मदत व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, मुंबईहूनही एनडीआरएफच्या आणखी दोन टीम घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. मध्यरात्रीच घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.



