पुणे, दि. १९ पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र दे ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी (दि. २२) राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुणे से बारामती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या समाजप्रबोधन करण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अँड. संदीप कदम यांनी दिली.
यावेळी खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सायकल असोसिएशनचे प्रतापराव जाधव, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. २२) सेनापती बापट रोडवरील बारामती हॉस्टेल येथे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, युवा नेते पार्थ पवार, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, सुनील शेळके, दिलीप मोहिते, महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांची उपस्थिती राहणार आहे.
मुख्य स्पर्धेचे उद्घाटन हडपसर ( ग्लायडिंग सेंटर) येथे ज्येष्ठ उद्योजक अदर पूनावाला यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आयर्न मॅन दशरथ जाधव, खासदार अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, अशोक पवार, अतुल बेनके, संजय जगताप, बाळासाहेब शिवरकर, उद्योजक सतीश मगर यांसह मान्यवर उपस्थित असतील. तर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी बारामती येथील ग.दि.मा. सभागृह येथे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार सुप्रियाताई सुळे, बारामती टेक्स्टाइल पार्क अध्यक्षा सुनेत्राताई पवार, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह अन्य उपस्थितीत होणार आहे.
पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीय आणि राज्य अशा दोन गटात १२० कि.मी. ची स्पर्धा होईल. सासवड ते बारामती (एमटीबी) खुली पुरुषांसाठी राज्यस्तरीय, माळेगाव ते बारामती मुलींसाठी राष्ट्रीय स्तरावर तर जिल्हा स्तरावर स्पर्धा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सायकलपटूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे आणि मानद सचिव अॅड. संदीप कदम यानी केले.




