मुंबई : मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती करण्याच्या निर्णय गृहखात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यावरून विरोधकांकडून राज्य सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र डागलं आहे.
“देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याचं डोक फिरलं की काय? मुंबईचे पोलीस दल जगात दोन नंबरचे आहे. त्या दलात ११ महिन्यांसाठी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पैसे घेऊन बदल्या करण्यात येतात. पोलीस खात्यात अनागोंदी कारभार सुरु आहे,” असा आरोप भाई जगताप यांनी केली आहे.



