मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरिश चौधरी यांची तब्बल दोन वर्षानंतर तुरुंगातून मंगळवारी (ता. २५) सुटका झाली आहे.
२०१६ मध्ये पुण्यात जमीनखरेदीसंबधीत प्रकरणात मनी लॉडंरीगच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. सर्व कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर त्यांना मुंबईतील आर्थर रोड जेलमधून सोडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने चौधरी यांना २१ जुलैला जामीन मंजूर केला होता.
मात्र त्यांच्या जामीनासंबधीची सर्व पुर्तता त्यांना पीएमएलये कोर्टात करावी लागली. ही प्रक्रीया मंगळवारी पुर्ण झाली.सर्वोच्च न्यायालयाने गिरिश चौधरी यांना काही अटी शर्तीवर जामीन दिला आहे. यामध्ये त्यांचा पासपोर्ट ईडीकडे जमा करावा लागेल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहवा लागेल. याशिवाय त्यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून जाता येणार नाही.



