
‘साहेब आता नाही ना कोणाला मारणार, आता माझी कॅपॅसिटी संपलीय, खुप दुखतंय ना…..’ हे ‘त्याच’ सराईत गुन्हेगाराचे शब्द होते जो ‘पोलीसांना काय कोणाच्या बापाला घाबरत नाही’, असे म्हणत सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी, खडकवासला परिसरात भर रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी करत दहशत माजवत होता. वैभव इक्कर (वय 23 रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव !
रविवारी ( दि.23) सराईत गुन्हेगार वैभव इक्कर व त्याचा साथीदार चेतन चोरघे (वय 27, रा. कोल्हेवाडी, खडकवासला) या दोघांनी सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या हॉटेलमध्ये तोडफोड करत लूटमार केली होती.
तसेच कारवाईसाठी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली होती. यापुर्वीही अनेक वेळा वैभव इक्कर या सराईत गुन्हेगाराने पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केलेला आहे. तसेच इतरही अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.



