मुंबई – राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने बेकायदेशीरित्या चालवल्या जाणाऱ्या टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश केला आहे. एटीएसने या प्रकरणात 32 वर्षीय रियाझ मोहम्मद उर्फ पीके या आरोपीला डोंगरीतून अटक केली असून, तो केरळचा रहिवासी आहे.
मुंबई शहरातील डोंगरी भागात बनावट टेलिफोन एक्सचेंज असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर बुधवारी 26 जुलैला अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या ठिकाणावर छापा टाकला. कारवाईत एकूण 4 सिम बॉक्सशिवाय एअरटेल कंपनीचे 149 सिमकार्ड जप्त करण्यात आले. तसेच छाप्यात 5 लाख 71 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
चिनी सिमबॉक्सचा वापर
एटीएसच्या माहितीनुसार, रियाझ मोहम्मद हा केरळचा रहिवासी रियाझ मोहम्मद उर्फ पीके हा त्याच्या एका बांगलादेशी साथीदारामार्फत चीनमध्ये बनवलेल्या सिम बॉक्सचा वापर करून अवैध कॉल सेंटर चालवत होता. यासाठी त्याने घर भाड्याने घेतले होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशात कॉल करण्याची सुविधा होती.



