राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण सतत एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. मंगेश चव्हाण हे एका कार्यक्रमानिमित्त आज (३१ जुलै) दुपारी मुक्ताईगरमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांना ‘तुमच्या विषयाचं ऑडिट होणार’ असा इशाला दिला. चव्हाण म्हणाले की, “खडसेंच्या विषयाचं ऑडिट होणार आणि ते जनतेसमोर येणार. मी एकदा कमिटमेंट केली की मी स्वत:चं सुद्धा एकत नाही. चव्हाण यांच्या या वक्तव्याला आता एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.
एकनाथ खडसे यांना मंगेश चव्हाणांनी दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर एकनाथ खडसे म्हणाले, तुला (मंगेश चव्हाण) कोणी अडवलं बाबा? सांगतो कशाला? ऑडिट कर, फॉडिट कर, काय करायचं ते कर. मी बापजाद्यांपासून श्रीमंत आहे. तुझ्यासारखा हमाल आणि भंगार विकणारा मी होतो का? मी एका चांगल्या घरचा माणूस आहे. तुला काय ऑडिट करायचं ते कर असे म्हटले आहे.
एकनाथ खडसे मगेश चव्हाणांना उद्देशून म्हणाले, तुला जे ऑडिट करायचं आहे ते कर, आत्ता सरकार तुझं आहे, कुठलं ऑडिट करायचं ते कर. तुला ज्या भानगडी करायच्या असतील त्या कर. ईडी लावलीय, आयकर विभाग लावला, आणखी तुला काय बघायचं आहे ते बघ. तुझी काय कुवत आहे? समाजात तुझी किंमत काय? तुला समाजात काय मान्यता आहे?



