
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापुरातील समृद्धी महामार्गावरील दुर्घटनास्थळी पाहणी केली. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. शहापुरातील दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. उड्डाणपुलाचं काम सुरु असताना गर्डर कोसळला त्यामुळे मोठा अपघात झाला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. आम्ही सर्व पाहणी केली आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड आहे. लाँचर आणि गर्डर कोसळल्यामुळे हा अपघात झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल.
७०० टन लाँचर आणि साडेबारा टनाचं गर्डर आहे. यामध्ये हे खाली पडल्यामुळे मोठा अपघात झाला.याप्रकरणी ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल झाले आहे. काम करत असलेली कंपनी स्विझलँडची आहे. याचे तांत्रिक सेंटर सिंगापूर आणि चेन्नईला आहे. मला विएसल हे काम सुरू होत. त्यांची तांत्रिक टीम देखील इथं येणार आहे. यामध्ये कशामुळे कोसलळं यांची चौकशी होईल, असे शिंदे यांनी सांगितले.



