
अलिबाग– सांगली येथील एक गृहस्थ महात्मा गांधी, ज्योतीबा फुले आणि तिरंगा झेंड्याबद्दल काही बोलतो, हा मोठा गुन्हा नाही का? उपमुख्यमंत्री म्हणतात आमचा त्यां गृहस्थांचा संबध नाही. ते वेगळ्या संघटनेचे आहेत. कोणाला फसवत आहात. लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, आणि कोणी जर बेजबाबदारपणे वागत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केली.
ते पाली येथे शेकाप वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी शेकाप सरचिटणी आमदार जयंत पाटील आणि पक्षाचे वरिष्ट नेते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. राज्याचे राजकारण गोंधळात टाकणारे आहे. काय चालले आहे हेच कळेनासे झाले आहे. शिवसेना सत्तेत आहे. विरोधातही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे आणि विरोधातही आहे. भाजप मात्र बाजूला राहून मजा बघत आहे. काही गडबड आहे ही गडबड मला समजून घ्यायची आहे. मी राजकारणी नाही, पण राजकारण्यात येण्याचा प्रयत्न करतो आहे. सुसंस्कृत राजकारण करण्याचा माझा प्रयत्न आहे.



