मुंबई : विधानसभा अधिवेशनाचा आज ( ४ जुलै ) अखेरचा दिवस आहे. वेदान्त फॉक्सकॉन, टाटा-एअरबस, सॅफ्रन या तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्राऐवजी अन्य राज्यांत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत गुरुवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिका विधिमंडळात सादर केली आहे. पण, या कंपन्यांनी राज्य सरकार आणि एमआयडीशीसी कोणताही करार केला नसल्याने हे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचं उद्योग विभागाच्या श्वेतपत्रिकेत सांगण्यात आलं. यावरूनही विरोधक शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एक खदखद पाहायला मिळत आहे. वर्षानूवर्षे शेतकऱ्यांसाठी झटत असलेल्या प्रामाणिक नेते आणि कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावला जात आहे. सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून पाहिलं झटका संघटनेला मिळाला होता. आता रविकांत तुपकर यांनी आपली नाराजी पक्षाच्या नेतृत्वावर बोलून दाखवली आहे. त्यामुळे भाजपात प्रवेशासाठी खुली ऑफर रविकांत तुपकर यांना आहे. त्यांच्या येण्याने भाजपा मजबूत होईल,” असं भाजपा नेते आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.



