जेजुरी : सोमवार, दि. ७ रोजी शासन आपल्या दारी, तसेच तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाची तयारी युद्ध पातळीवरून जेजुरीच्या पालखी मैदानावर करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या सुमारे एक लाख चौरस फुटांचा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.
या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनाने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने, वाहतूककोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदलाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
अशी असेल वाहतूक
जेजुरी पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण हाटीतील वाहतूक सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरिता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर था- हतूक पूर्णपणे बंद करून, त्यावरील वाहने ही निरा-मो- रगाव-सुपा ते केडगाव चौफुलामार्गे पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरून पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. बारामतीकडे जाणारी वाहने बेलसर-कोथळे- नाझरे सुपे-मो- रगाव रस्तामार्गे बारामती- फलटण- सातारा मार्गे जातील.
हे आहेत पर्यायी मार्ग
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड़, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करून, ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुलामार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरून पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.
■ सासवड पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहने पुणे बाजूकडून जेजुरीमार्गे फलटण – सातारा बाजूकडे जाणारी जड चाहने सासवड- नारायणपूर- कापूरहोळमार्गे सातारा- फलटण मार्गे जातील.


