नवी दिल्ली केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारच्या विरोधात लोकसभेत मांडल्या गेलेल्या अविश्वास ठराव वेळी महाराष्ट्रातील खासदारांची आपापसातील भांडणे संसदेत होत असल्याचे दिसून आले. सरकारी पाडणारा भाजप, नववर्षात नऊ सरकारी पाडण्याचा विक्रम भाजपने केला आहे. कोविड काळात भ्रष्टाचाराचे नियोजन, वाघ नवे मांजर, तुमची औकात नाही आणि पळपुटे लोक अशा अनेक बोचरी टीका खासदारांनी एकमेकांशी लोकसभेत करत असल्याचे दिसून आले. तो वाद मिटवण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
मणिपूर हिंसाचारावरून इंडिया आघाडीने मांडलेल्या अविश्वास ठरावावेळी लोकसभेत चर्चा सुरू होती. या चर्चेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी कर्नाटक सह नऊ राज्यांमधील सरकारी पाडणारा भाजप पार्टी विथ डिफरन्स कसा असावा केला.
कोविड काळात महाराष्ट्रात उपायोजना रोजी भ्रष्टाचार कसा करायचा याचे नियोजन करण्यात आले. तर अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी अडीच दिवस मंत्रालयात गेल्याचा विक्रम केला असल्याचा शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी सरकारने केलेले कामांचे दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली असताना त्यांच्यावर आरोप केले जातात तेव्हा तुम्हीही आमच्याबरोबरच होता असा टोला उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
ठाकरे गटाचा हिंदुत्वाचा अभिमान असेल तर सत्ता प्राप्तीसाठी शरद पवार सोबत जाताना त्यांना हिंदुत्वाचा अभिमान नाही आठवला का अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
एकूणच राज्यातील सत्ता संघर्षा मधील अंतर्गत टीका टिपणी आणि भाजप पक्षाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पाडलेली फुट यामुळे संतापलेले उद्धव ठाकरे गट व शरद पवार गट यांचे खासदार यांनी थेट भाजपच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला. अगदी एकमेकांच्या वरती हमरी तुम्ही येऊन राज्यातील सत्ता संघर्षाचे उद्रेक संसदेच्या चावडीवर झाल्याचे दिसून आले.



