मुंबई : राज्यात शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन महायुती सरकार सत्तेवर आले. याचवेळी ठाकरे गटात पडलेल्या फुटी नंतर त्यांनी 16 आमदारांच्यावर आपत्रतेची कारवाई केली. याच आमदारांच्या अपत्र संबंधित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत.
आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार असल्याने शिवसेनेच्या ज्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस मिळाली आहे, त्याने मनात अस्वस्थता वाढली आहे. शिवसेनेच्या बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्ता मिळवली. सत्ता नाट्याचा हा खेळ सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तिथून त्या आमदारांच्या अपात्रतेचा विषयी निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष असलेले न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी त्यापुढील प्रक्रिया सुरू केली आहे.


