ठाणे (प्रतिनिधी) राज्यात मिंधे सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक 1) न उद्योग आणि असंख्य नोकऱ्या गुजरातला पळविल्यानंतर आता ठाणे 5 महापालिकेला गुजरातच्या प्रेमाचे भरते आले आहे. महाराष्ट्रातील आणि ठाण्यातील मराठी ठेकेदारांना ‘बायपास’ करून ठाणे महापालिकेने गुजरातच्या एका कंपनीला रस्त्याच्या साफसफाईचा ठेका दिला आहे.
‘प्रभात डिझेल’ असे या कंपनीचे नाव असून, ही कंपनी केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्याच्या मर्जीतील असल्याचे सूत्रांनी सांगितले. यांत्रिक पद्धतीने सफाईसाठी दोन मशीन गुजरातमधून आणली असून, वर्षाला साडेपाच कोटींचा मलिदा या गुजराती कंत्राटदाराच्या घशात जाणार आहे.



