मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीने सुरू झालेला कल्लोळ थांबायचं नाब घेत नाही. आता या प्रकरणावर थेट अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया आली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदे सरकारमधील मंत्री आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं की, शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे बाकीचे लोक काय म्हणतात? याला फार महत्त्व नाही. तसेच राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यावा, असा टोलाही वळसे पाटील यांनी लगावला.
नवाब मलिक यांच्या जामिनावर ते म्हणाले की, मलिकांना न्यायालयीन प्रक्रियेतून जामीन मिळाला आहे. त्यांना विश्रांती घेऊ दिली पाहिजे. कोणत्या गटात जायचं, याचा निर्णय ते शांतपणे घेतील, असंही वळसे पाटील म्हणाले.



