माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव त्यांना जामीन दिला आहे. मागील काही दिवसांपासून मलिक क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेत होते. जामीन मिळाल्यानंतर अखेर त्यांची सुटका झाली आहे. त्यामुळे आता ते नेमक्या कोणत्या गटात जाणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सूचक विधान केलं आहे.
आधी नवाब मलिक यांची प्रकृती बरी होऊ द्या. त्यानंतर कोणत्या गटात जायचं? हे तेच ठरवतील. ते कुठेही गेले तरी फार लांब जाणार नाहीत. ते इकडेच राहतील, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.


