पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते. पण, हडपसरमधील एका सभेमध्ये ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारीच बसल्याचं दिसून आलं. तसेच गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांनी अनेकदा अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे चेतन तुपे नेमकं कोणत्या गटात आहेत असा प्रश्न निर्माण होत आहेत.
हडपसरमधील एका कार्यक्रमात अजित पवार आणि चेतन तुपे एकत्र आले. ते एकमेकांच्या शेजारी बसले होते. त्यामुळे गोंधळ निर्माण होत असून तुपे नेमकं कोणासोबत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे. चेतन तुपे यांच्या या कृतीमुळे मतदारसंघातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. चेतन तुपे यांचा अजून निर्णय नक्की झाला नाही का? चेतन तुपे आता अजित पवारांसोबत गेलेत का? असे प्रश्न विचारले जात आहेत.चेतन तुपे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
चेतन तुपे यांनी याआधी दोनदा अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी स्पष्टपणे शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. पण, ते अजित पवार यांच्यासोबत जास्त दिसत आहेत. त्यामुळे चेतन तुपे अजित पवार गटाकडे वळाल्याची चर्चा होऊ लागली आहे. अजित पवारांनी रविवारी बारामतीमध्ये शक्तीप्रदर्शन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.




