डिजिटल रुपया कसा येणार?
प्रायोगिक तत्त्वावर बाजारात आणल्या गेलेल्या डिजिटल रुपयाच्या व्यवहारांत आठ बँकांना सहभागी होण्यास रिझर्व्ह बँकेने सांगितले.
पहिल्या टप्प्यात
भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बैंक, येस बँक व आयडीएफसी फर्स्ट बैंक या चार बँका चार शहरांतून डिजिटल रुपया सादर करतील.
■ दुसऱ्या टप्प्यात
युनियन बैंक ऑफ इंडिया, एचडीएफसी बैंक, बैंक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्र बँक या चार बँका डिजिटल रुपया बाजारात दाखल करतील असे त्या वेळी ठरले होते.
खरेदी कशी करावी?
■ वरील आठ बँकांपैकी कोणत्याही एका बँकेच्या वेबसाइटवर किंवा
या बँकांच्या अॅपवर जावे. ई-रुपया वॉलेट वापरण्यासाठी तुमची नोंदणी करावी.
■ क्लोज्ड यूझर ग्रुपमध्ये तुमची निवड झाल्यास संबंधित बैंक स्वतःहून तुम्हाला कळवेल.
तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असेल व तुमच्या नावाची निवड झाल्याचे तुम्हाला बँकेने कळवले असेल तर तुमच्या ई-रुपया वॉलेटमध्ये तुम्हाला पैसे भरावे लागतील. तुम्ही जसे प्रत्यक्ष रुपया वॉलेटमध्ये भरता त्याप्रमाणेच ही प्रक्रिया करावी लागेल,
ई-रुपया वॉलेटमध्ये पैसे भरण्यासाठी तुम्हाला यूपीआय आधारित अॅपचाही वापर करता येईल.
ई- रुपया वापरायचा कसा?
■ रुपयाचे इलेक्ट्रॉनिक टोकन म्हणून रिझर्व्ह बँकेने ई-रुपया आणला आहे.
क्लोज्ड यूझर ग्रुपमध्ये व्यापारी आणि ग्राहक यांचा समावेश आहे. टिकणारे चलन आहे. निवडक ठिकाणी असे ग्रुप सध्या कार्यरत आहेत.
■ कागदी नोटा व नाणी यांच्या मूल्याप्रमाणेच डिजिटल रुपयाचेही मूल्य आहे. हा रुपया बँकांच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचवला जाणार आहे.
■ ई-रुपयाचे ऑनलाइन व्यवहार करताना ते दोन व्यक्तींमध्ये किंवा व्यक्ती व व्यापारी यांच्यात करता येतील, यासाठी पेमेंटसाठी शॉपिंग मॉल किंवा दुकाने येथील क्यूआर कोडचा वापर करता येणार आहे. डिजिटल रुपया बैंक ठेवींमध्ये रूपांतरित करता येईल; परंतु त्यावर व्याज मिळणार नाही.
ई-रुपयाचे फायदे
सीबीडीसी किंवा ई-रुपया हे रिझर्व्ह बँकेने दिलेले सार्वभौम
चलन आहे. ई-रुपया गरज भासल्यास प्रत्यक्ष रुपयात रूपांतरित करता येतो.
■ हे लवचीक चलन आहे. ई-रुपया फाडून टाकता येत नाही, त्याचे आगीमुळे नुकसान होऊ शकत नाही. त्यामुळे ते चिरकाल चलन आहे.
■ डिजिटल रुपया हा मध्यवर्ती बँकेने बाजारात आणलेला आहे.. त्यामुळे तो आभासी चलनाप्रमाणे बेभरवशी नाही.
ई-रुपयाचे प्रकार
■ सीबीडीसी आर हा प्रकार बिगर आर्थिक ग्राहक, खासगी क्षेत्रे, व्यावसायिक वापरू शकतात. सीबीडीसी डब्ल्यू हा प्रकार निवडक वित्तसंस्थांपुरता बंधनकारक केला गेला आहे.




