मुंबई : देशातील सर्वांत श्रीमंताच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी अव्वल स्थानी •असून, त्यांची एकूण संपत्ती ९५ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्स मासिकाच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
जागतिक क्रमवारीत ते १२ व्या स्थानावर आहेत. त्यानंतर गौतम अदानी यांचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती ५४.४ अब्ज डॉलर आहे. जागतिक यादीत ते २४ व्या स्थानावर आहेत. त्यानंतर २८.६ अब्ज डॉलर संपत्तीसह एचसीएल टेकचे शिव नाडर यांचा तिसरा क्रमांक लागतो. ‘जेएसडब्ल्यू’ समूहाच्या सावित्री जिंदाल चौथ्या स्थानावर असून, त्यांची एकूण संपत्ती २२.५ अब्ज डॉलर आहे.
पाचव्या स्थानावर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला हे आहेत. त्यांची संपत्ती २०.२ अब्ज डॉलर आहे. त्यांनतर अनुक्रमे सन फार्माचे दिलीप संघवी, डी-मार्टचे राधाकिशन दमानी, आर्सेलर मित्तल समूहाचे लक्ष्मी मित्तल, आदित्य बिर्ला समूहाचे कुमारमंगलम बिर्ला, बँकर उदय कोटक यांचा क्रमांक लागतो. एकूण १६९ भारतीयांनी ‘फोर्ब्स’च्या २०२३ च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी ही संख्या १६६ होती.



