नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता लोकसभा, राज्यसभेतील खासदारांबाबत माहिती समोर येऊ लागली आहे. कोणत्या खासदारांवर किती गुन्हे दाखल आहेत तर कुणाकडे किती संपत्ती आहे.
द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची सरासरी मालमत्ता ३८.३३ कोटी रुपये आहे. यातही ज्यांच्यावर का फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांची मालमत्ता ५०.०३ कोटी तर न्य गुन्हे दाखल नसलेल्या खासदारांची मालमत्ता सरासरी ३०.५० कोटी आहे. याबाबत आणखी बाब म्हणजे देशातील खासदारांपैकी सर्वाधिक श्रीमंत खासदार हे तेलंगणा राज्यातील असून,यामध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. याच अहवालानुसार सध्या लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण खासदारांपैकी सर्वाधिक श्रीमंत खासदार हे भाजप पक्षाचे असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये भाजपचे ३८५, त्यानंतर टीआरएसचे २६ वायएसआरसीपीचे ३१, काँग्रेसचे ८१, आपचे ११ डीएमकेचे ३४, शिरोमणी अकाली दलचे २, राजदचे ६ तर अपक्ष ६ खासदारांचाही यामध्ये समावेश आहे. भाजपमधील हे अब्जाधीश १४ आहेत, खासदार तर आयएसआरसीपी आणि टीआरएसचे प्रत्येकी ७, काँग्रेसचे ६ आम आदमी पक्षाचे आणि ३ राजदचे २ खासदार हे अब्जाधीश असल्याची माहिती समोर आली आहे.




