जळगाव : शंभर दोषी सुटले तरी चालतील मात्र एका निरापराध्याला शिक्षा होऊ नये. न्यायदानासंदर्भातील या वाक्यानुसार विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सुद्धा आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शंभर दोषी सुटले तरी चालतील मात्र एका निरापराधाला शिक्षा होऊ नये, असं न्यायदानासंदर्भात एक वाक्य आहे.. त्यानुसारच विधानसभेचे अध्यक्ष सत्ता संघर्ष बाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटातील ४० आमदार हे सुरक्षित आहेत हे सांगताना शिवसेनाही आमचीच आहे.. शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील शिक्कामोर्तब केलं आहे, असं किशोर पाटील म्हणाले.