‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून फेमस असलेली नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. करवीर आणि राधानगरी तालुक्यातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना संमीत नाकारण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आणि आयोजन बंदोबस्ताचं कारण देत पोलिसांनी ही संमती नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात असे कार्यक्रम आयोजित करु नये असं आवाहनही जिल्हा पोलीस प्रमुख महेश पंडीत यांनी केलं आहे.
काय म्हटलं आहे पोलिसांनी?
https://www.instagram.com/reel/CxaEcfiOsSO/?igshid=MzRlODBiNWFlZA==
गौतमी पाटीलचा जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्याला पोलिसांनी संमती दिलेली नव्हती. राशिवाडे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथेही आम्ही परवानगी दिलेली नाही. हे कार्यक्रम रद्द करण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की, संपूर्ण जिल्ह्यात गणेश उत्सव सुरु आहे. गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस दल रस्त्यावर आहे. ज्या कार्यक्रमांना गर्दी जमते अशा कार्यक्रमांना परवानगी देणं हे आम्हाला शक्य होणार नाही. यापूर्वीचे या कार्यक्रमातले अनुभव लक्षात घेता आम्ही परवानगी नाकारली आहे. या कार्यक्रमाला बंदोबस्त देणं हे तातडीने शक्य नाही त्यामुळे हा निर्णय आम्ही घेतला आहे.कोल्हापूरचं जे नृत्य मंडळ आहे त्यांनीही आम्हाला हीच विनंती केली आहे असंही पंडीत यांनी सांगितलं आहे.