मुंबई ; शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरले आहे. राज्यातील सत्तासंघर्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा शिवसेना आमदारांच्या अपात्रते प्रकरणी १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार असून २३ नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना पाठवलेल्या होणार आहे.
आमदार अपात्रता प्रकरणातील शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे सुनावणीच्या वेळापत्रकाच्या गटातील आमदारांना विधानसभा प्रतिवरून हे सिद्ध झाले आहे. अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील त्यामुळे याप्रकरणी नवरात्रीत वेळापत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात कागदपत्रांची सुनावणी होणार आहे.
सुनावणीचे वेळापत्रक
■ १३ ऑक्टोबर सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही, सुनावणी # १३ ते २० ऑक्टोबर दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेल्या कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करणार
२० ऑक्टोबर सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही, निकाल
■ २० ऑक्टोबर अधिकची कागदपत्रे सादर कराण्यासाठी संधी # २७ ऑक्टोबर दोन्हीही गट आपापले म्हणणे ( स्टेटमेंट) मांडणार
■ ६ नोव्हेंबर: दोन्ही गटांचे दावे-प्रतिदावे
# १० नोव्हेंबरः गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी
■ २० नोव्हेंबर: दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाणार
■ २३ नोव्हेंबरः साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार
राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर ?
या प्रकरणाची सुनावणी चालू असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एक आठवडा परदेश दौऱ्यावर असणार आहेत. घाना देशात पार पडणाऱ्या ६६व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह ते हजेरी लावणार आहे. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत परिषद होणार आहेत. जगातील विविध देशांतील संसद व विधीमंडळ प्रमुख सामील होणार आहे. जागतिक संसदीय व राजकीय प्रश्नावर विचारमंथन होणार आहे.



