पुणे : पुणे शहरात गेली दहा दिवस संपूर्ण भक्तीमय वातावरण, उत्साह निर्माण करणाऱ्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे. पुण्यातील गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे शिस्त, परंपरा जपत गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी विसर्जनासाठी मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक आधी निघते. त्यानंतर मग इतर छोटे-मोठी गणेश मंडळ आपल्या गणपतींचं विसर्जन करतात.
सकाळी १०:०० वाजल्यापासून शहरात विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार असून सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. सर्व मंडळे आणि महापालिका प्रशासन तसेच पोलिसांनी या मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे. शहर गेल्या दहा दिवसांत गौरींचेही आगमन झाले, त्यांना येत असल्याने अशी कुटुंब देखावे होते. गणेशाच्या आनंद चतुर्दशी दिवशी निरोप देण्यात येणार आहे. हा भक्तिमय सोहळा पाण्यासाठी अनेक नागरिक रस्त्यावर उतरणार आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक ढोल ताशा पथक लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज आहेत.
मंडईतील टिळक पुतळ्यापासून प्रारंभ…
मंडईतील टिळक पुतळ्यापासून गुरुवारी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमाराला मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर मानाच्या गणपतींची मिरवणूक बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याला लागेल. या मंडळांनी त्यांचे नियोजनही जाहीर केले आहे. हेच अन्य प्रसिद्ध गणपती मंडळांचेही नियोजन असून, त्यांनी या आधीच हे जाहीर केले आहे.
कडक पोलीस बंदोबस्त…
पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला असून मिरवणूक मार्गांना जोडणारे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. रात्री उशिरा या रस्त्यावर बांबूंचे बॅरीकेडींग करण्यात आले आहेत. याशिवाय महापालिकेनेही गणपती विसर्जनासाठी विसर्जन हौद आणि निर्माल्य कलशांची सोय केली आहे. याशिवाय नदीपात्रात लाईफगार्ड आणि अन्य सुरक्षेचे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- सकाळी १०:०० वाजता मिरवणुकीस सुरुवात
- ९ हजार पोलिसांचा पहारा
- ३०० पेक्षा अधिक ठिकाणी विसर्जनाची सुविधा
- १५० फिरते हौद
- २१ ठिकाणी पार्किंगची सुविधा
- ११ प्रमुख रस्त्यांवर पार्किंगला बंदी
- १५०० स्वच्छता कर्मचारी
- नदीपात्रात विसर्जनास बंदी
- मानाच्या गणपतींचे विसर्जन कृत्रिम हौदात
- अग्निशमन दलाचे १२८ कर्मचारी नदीवर तैनात



