नवी दिल्ली : – एकीकडे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटाच्या ४ खासदारांना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्याकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे. शिंदे गटाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
नुकतेच संसदेचे विशेष अधिवेशन झाले. यात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. यासाठी संसदेत मतदानही घेण्यात आले. मात्र, मतदानाच्या दिवशी ठाकरे गटाचे चार खासदार अनुपस्थित होते. मात्र, गैरहजेरीबाबत त्यांनी कोणता निर्णय लोकसभा सचिवालयाला कळविला नसल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्द्यावरून शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना कोंडीत पकडले गेले आहे.



