मुंबई – मुख्यमंत्री शिंदे यांना गुंतवणूक आणण्यासाठी विदेश दौरा करण्याची गरजच काय, असा सवाल करून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जी गुंतवणूक गुजरातेत गेली आहे ती आधी परत आणावी संपूर्ण नागपूर जलमय झाले आहे. महाराष्ट्रातील काही भाग दुष्काळाने होरपळत आहे, मुख्यमंत्र्यांनी त्या भागांना भेट का दिली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पूरग्रस्त भागाला भेट न देता मुख्यमंत्री बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींसोबत गणेशचतुर्थीचा सण साजरा करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली.
राऊत म्हणाले की, महाराष्ट्र संकटात असताना मुख्यमंत्र्यांना परदेश दौऱ्याची गरज नाही. महाराष्ट्रातील कांदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात होणाऱ्या विलंबावरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात समस्या असताना पियुष गोयल शेतकऱ्यांना दिल्लीत का बोलावत आहेत, गोयल यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केले आहे? असा सवाल त्यांनी केला.



