मुंबई : रस्त्यांवर सतत पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न तर निर्माण झाले आहेतच, शिवाय या खड्ड्यांमुळे मुंबईकर करदात्यांच्या खिशालाही चांगलाच फटका बसत आहे. गेल्या १० वर्षांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी करदात्यांचे तब्बल २८६.६२ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. २०१३ ते २०२३ या वर्षातील आकडेवारीवर नजर टाकल्यास खड्ड्यांनी करदात्यांना किती खड्ड्यात पाडले आहे, हे स्पष्ट होते.
खड्डे बुजविण्यासाठी सर्वात जास्त खर्च २०२२-२०२३ या वर्षात झाला आहे. तर २०१६-१७ या वर्षात सर्वात कमी म्हणजे ६.९५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
पावसाळा असो वा नसो, रस्त्यांवर पडणारे खड्डे ही मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. खड्ड्यांची जबाबदारी नेमकी कोणत्या यंत्रणेची यावरूनही बेबनाव असल्याचे दिसून आले आहे. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गाची देखभाल पूर्वी एमएमआरडीए करत होते. अलीकडेच हे महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. या महामार्गावर होर्डिंग किंवा डिजिटल जाहिरातबाजीतून मिळणारे उत्पन्न एमएमआरडीएच्या तिजोरीत जमा होत आहे. रस्ते डागडुजीचा खर्च मात्र पालिकेला करावा लागत आहे.य



