पुणे : विसर्जन मिरवणुकीत अनेकांचे मोबाइल संच चोरीला गेले. लक्ष्मी रस्त्यासह टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता या विसर्जन मार्गावर गुरुवारी रात्री झालेल्या गर्दीत चोरट्यांनी मोबाइल चोरल्याच्या तक्रारी पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या ऑनलाइन पोर्टलवर करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवात भाविकांच्या खिशातील रोकड, तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याच्या घटना दरवर्षी घडतात. पुण्यातील विसर्जन सोहळा भाविकांचे आकर्षण आहे. गुरुवारी (२८ सप्टेंबर) मध्यरात्री लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाइल संच चोरट्यांनी चोरले.




