यवतमाळ : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा आज यवतमाळमध्ये पार पडली. या सभेत तुफान राडा झाल्याचं समोर आलं आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापल्याप्रकरणी हा राडा झाला. हा राडा एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष आणि सनद रद्द झालेले गुणरत्न सदावर्ते यांनी हॉटेलमध्ये बसून व्हिडीओ कॉलवरून पाहिला असल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “शरद पवारांचे बगलबच्चे तांदळा एवढ्या खड्याइतके होते. गोंधळ वगैरे काही करू शकले नाहीत. तोंडातून शब्दही बाहेर पडले नाहीत. अत्यंत घाणेरडी कृती आहे. संदीप शिंदेंना (महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष) धडा शिकवण्याची गरज आहे. ज्या अहवालावर प्रभू राम चंद्रांचा फोटो, हिंदू राष्ट्रभारत लिहिलेला आहे, त्या अहवालावर हात लावण्याचा प्रयत्न केला आणि तिथून झोडपून बाहेर काढलेलं आहे



